जळगाव । नवीन वर्षामध्ये सोन्याच्या दरात सातत्याने वाढ दिसून येत आहे. आज मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा सोन्याचे दर वाढले आहे. यामुळे जळगाव येथील सराफा बाजारात सोन्याचा महागाईचा पतंग आकाशी गेला आहे. ग्राहकांच्या खिशावर संक्रांत आली आहे.
जळगावच्या सराफ बाजारात आठवडाभरात सोने प्रतितोळा ११०० तर चांदी २ हजार रुपयांनी महागली. आज ग्राहकांना सोने-चांदी खरेदीसाठी अधिक दर मोजावा लागेल. सध्या स्थितीत सोने जीएसटीसह ८१,१६४ रुपये तर चांदी ९२ हजार रुपयांवर पोहोचली आहे. ग्राहक राजाला हा नवीन दर ऐकून घाम फुटला आहे.
नववर्षाच्या सुरुवातीला सोने ७६,५०० रुपये प्रतितोळा तर चांदी ८८ हजार रुपये किलो होती. म्हणजे अवघ्या दोन आठवड्यात सोने पाच हजारांच्या घरात तर चांदी चार हजारांच्या जवळपास महागली आहे.नवा विषाणू आणि शेअर बाजारातील मोठी घसरण याचा सोन्या-चांदी दरावर परिणाम होत असल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
Discussion about this post