जळगाव । गेल्या काही दिवसापासून सातत्याने होत असलेल्या दरवाढीने सोने आणि चांदीच्या किमतीने नवीन रेकॉर्ड केला आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात दारात वाढ झाल्याने ग्राहकांना झळ बसत आहे. अशातच सोने व चांदीचे दर सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा दरवाढ होईल, असा सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज आहे.
बुधवारी सोने प्रतितोळा ६२,७५० आणि चांदी प्रतिकिलो ७५,१०० असा दर होता. याआधी झालेल्या दरवाढीच्या तुलनेत होणारी घट कमी आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा दरवाढ होईल, असा सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज आहे.
मंगळवारी, बाजार उघडल्यावर सोन्याचे दर १,३०० रुपयांनी कमी झाल्याने ते प्रतितोळा ६३ हजार रुपये झाले होते. चांदी दोन हजार रुपयांनी कमी झाल्याने प्रतिकिलो दर ७६ हजार रुपयांवर खाली आले होते. यानंतर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सोने २५० रुपयांनी आणि चांदी ९०० रुपयांनी कमी झाली. त्यामुळे सोने प्रतितोळा ६२,७५० व चांदी प्रतिकिलो ७५,१०० असा दर होता.
डिसेंबरअखेर राहतील एवढे दर…
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्याबद्दल सुवर्ण व्यावसायिक आदित्य नवलखा म्हणाले, की यापूर्वी साडेतीन हजार रुपयांनी दर वाढले होते, कमी होताना १२००-१३०० रुपयांनी घट झाली आहे. पुढील आठवड्यात दर पुन्हा वाढतील. चालू वर्षाच्या डिसेंबरअखेरपर्यंत सोन्याचे दर ६४ हजारपेक्षा अधिक होऊ शकतात, असा अंदाज आहे.
Discussion about this post