जळगाव: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण सोने खरेदी करतात. मात्र त्याआधीच सोने चांदीच्या दरात भाववाढ झाली आहे. त्यामुळे सणावराला खरेदी करण्याची तयारी दाखवणाऱ्या ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात १,५०० रुपयांनी वाढ झाली आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी जळगावमध्ये सोन्याचे दर ८८ हजार रुपये इतके होते. आज अचानक या दरात पंधराशे रुपयांनी वाढ झाली. सोन्याचा आजचा दर ८९ हजार ३०० रुपयांवर पोहोचला आहे. हाच दर जीएसटीसह ९२ हजार रुपयांपर्यंत गेल्याने जळगावमध्ये ग्राहकांचा सोनेखरेदीला काहीसा कमी प्रतिसाद दिसून आला होता.
२ एप्रिल रोजी ट्रारिफ रेट लागू होणार आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे अशी माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिली आहे. ३० मार्च रोजी गुढीपाडवा आहे. या निमित्ताने अनेकजण सोन्याची खरेदी करतात. पण सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दुकानांमधील गर्दी कमी झाल्याचे म्हटले जात आहे.
Discussion about this post