जळगाव । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आपल्या पक्षातील उमेदवारांसाठी ठिकठिकाणी सभा घेत असून याच दरम्यान जळगावातील सभेत शरद पवार यांनी घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार आम्ही करत आहोत आणि हे तुमच्या शिवाय शक्य नाही. नरेंद्र मोदी हे 400 खासदार हवे तसे सांगत होते. तेवढे लागत नाही पण लोकांना शंका आली. यात काही काळबेरं दिसत आहे. मात्र 400 जागा जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत घटना बदलता येणार नाही अशी माहिती त्यांच्याच लोकांनी सांगितली. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत बदल करण्याचं यांच्या मनात पाप होतं. याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली. त्यासाठी सर्व एकत्र आले. इंडिया नावाची आघाडी काढली. सर्वांना एकत्र केलं वाटेल ते करू मात्र घटना बदल करू देणार नाही, असं शरद पवार म्हणालेत.
चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार या दोघांना सोबत घेऊन केंद्रात सरकार स्थापन केले. काय केलं सत्ता .कोणत्या निर्णय घेतले. काय अवस्था आहे देशातल्या शेतकऱ्यांची काय आहे देशातल्या तरुणांची आणि भगिनींची काय अवस्था आहे. एका वर्षात 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्याच्या मालाला किंमत देत नाही… जो माल पिकवतो त्याला त्याच्या उत्पादननुसार नाव मिळत नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.















Discussion about this post