जळगाव : शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार निलेश राणे यांनी मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या संशयावरून मालवणमधील एका भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपाबाबत बोलण्यास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टाळले असून दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं मोठं विधान रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे गुरुवारी (27 नोव्हेंबर) जळगावच्या दौऱ्यावर होते. जळगावध्ये ते महायुतीच्या उमेदवारांचा जोमात प्रचार करत आहेत. त्यांच्या याच दौऱ्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारला.
यावर बोलताना पण, रविंद्र चव्हाण यांनी सूचक विधान केले. “मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. मी नंतर यावर भाष्य करेन” असे थेट विधान त्यांनी यावेळी केले. त्यांच्या या विधानाने आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, निलेश राणेंनी केलेले आरोप हे खोटे असल्याचे विधान केले आहे.















Discussion about this post