जळगाव । राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. वेधशाळेच्या माहितीनुसार दोन दिवस मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस होऊ शकतो. एवढेच नव्हे तर आज ९ जानेवारीला जळगाव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. पावसामुळे तापमान घसरुन थंडी वाढेल.
तुम्ही पुढील तीन दिवस कामानिमित्त घराबाहेर पडणार असाल तर स्वेटरसोबत छत्री देखील सोबत ठेवा. कारण वेधशाळेच्या माहितीनुसार ८ ते १० जानेवारीदरम्यान मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस होऊ शकतो. एवढेच नव्हे तर ९ जानेवारीला जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. पावसामुळे तापमान घसरुन थंडी वाढेल.
पश्चिम विक्षोभामुळे वायव्य दिशेकडून येणारे वारे व आग्नेय दिशेकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या परस्पर क्रियेमुळे ढगाळ वातावरण व हलका ते अती हलक्या स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्यापरस्पर क्रियेमुळे महाराष्ट्रात ढगाळवातावरण व हलका ते अती हलक्यास्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. एककमी दाबाची रेषा लक्षद्वीपपासूनविदर्भापर्यंत आहे. ती दक्षिण कोकणव पश्चिम मध्य महाराष्ट्रातून जाते.यामुळे राज्याच्या तुरळक ठिकाणीमेघगर्जनेसह हलका पाऊस होईल.यामुळे पुढील चार ते पाच दिवसातकिमान व कमाल तापमानात ३ ते ४अंशांची घसरण होईल.
११ पासून स्थिती सामान्य हवामान बदलामुळे मध्य महाराष्ट्रात ८ व १० जानेवारीदरम्यान मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. तीन दिवसांत काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. यानंतर स्थिती सामान्य होईल, अशी माहिती आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी दिली.
Discussion about this post