जळगाव | जून निम्मा झाला तरी अद्याप जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अशातच आज बुधवारपासून ते २३ जूनपर्यंत ऊन, वगाळ वातावरणासह तुरळक व हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी मान्सूनने राज्यात प्रवेश केला आहे. त्यानंतर पावसाचे वातावरण झाले खरे पण, त्याला ताकद लागेना. अजूनही कमी प्रमाणात पाऊस होत आहे. पडेल त्या ठिकाणीच पाऊस असेच चित्र सध्या बघायला मिळत आहे. सोमवारी सायंकाळी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र, मंगळवारी सकाळपासून उन्हाचा तडाका वाढला होता. तापमान ३९ अंशांवर पोहोचले होते. आठवडाभर तापमान ३८ ते ४९ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. उकाड्यानेही जळगावकर हैराण झाले आहेत.
२३ जूनपर्यंत शहरासह जिल्ह्यात हलका व तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. २२ जूनला विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. या काळात प्रचंड उकाडा जळगावकरांना सहन करावा लागणार आहे. २४ जूनपासून मान्सून सक्रीय झाला तर १ जुलैपर्यंत पाउस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे















Discussion about this post