जळगाव । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी एक महत्त्वपूर्ण कारवाई करत पोलिसांनी एका हॉटेलमध्ये छापा टाकला. या छापेमुळे सहा महिलांना सुटका करून दिली गेली आणि दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसी भागात जी-सेक्टरमधील सागर लॉजवर वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सोमवार ६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलिसांनी सागर लॉजवर छापा टाकत ६ महिलांची सुटका तर २ जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
Discussion about this post