जळगाव : जळगाव एसीबीच्या पथकाने जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस हवालदारांना 2000 हजार रुपयाची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. रविंद्र प्रभाकर सोनार (वय- 47 वर्ष) व धनराज निकुभ असं लाचखोर पोलिसांचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली.
याबाबत असे की, तक्रारदार हे केंद्रीय अर्ध सैनिक बलमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. त्यांचे व त्यांची पत्नी यांचे कौटुंबिक कारणावरून भांडण झाले होते. त्याबाबत त्यांच्या पत्नीने तक्रारदार यांचे विरुद्ध दिनांक 04/02/2025 रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या गुन्ह्याच्या चौकशी कामी रवींद्र सोनार तक्रारदार यांना फोन करून चौकशीकामी पोलीस ठाणेस बोलावून घेतले होते. त्यांनी धनराज निकुभ याच्या सोबत भेट घेऊन त्यांना गुन्ह्याचे तपासकामी अटक न करण्यासाठी,योग्य ती मदत करण्यासाठी,तसेच त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल न पाठवण्यासाठी 50 हजार रुपयाची मागणी केली होती.
यातील संशतीय निकुंभ यांनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावल्याने तक्रारदार यांनी दि. 11/04/2025 रोजी लाप्रवी जळगाव येथे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून दि. 11/04/2025 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान संशयित निकुंभ याने तक्रारदार यांना 50 हजार रुपये ची लाच मागणी करून तडजोडीअंती 20000/-रु.स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून 11/4/2025 रोजी सापळा कार्यवाही दरम्यान रवींद्र सोनार याला लाच रक्कम 20,000/- रुपये पंचासमक्ष स्वतः स्वीकारली. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून दोन्ही संशयित यांचेविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे कलम 7,12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
Discussion about this post