जळगाव : जम्मू काश्मीर येथील पहेलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त करत जशास तसा बदला घेण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे. अशातच आता जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात पाकिस्तानातून आलेले एकूण 405 नागरिक वास्तव्य करत आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या व्हिसावर भारतात आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. यापैकी 327 नागरिकांना लॉंग टर्म व्हिसा (LTV) एक्सटेन्शन मिळाले आहे, दोन जणांना भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले आहे, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. 12 नवीन नागरिक अलीकडेच भारतात आले आहेत. तसेच 12 जणांना LTV एक्सटेन्शन ऑन मंजूर करण्यात आले आहे.
Discussion about this post