जळगाव । जळगाव शहरात किरकोळ कारणावरूनही गुन्हेगारी वाढताना दिसत असून अशातच शहरातील आकाशवाणी चौकात जुन्या वादातून एका तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून डोक्यात दगड टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव विनोद पाटील (वय-२१, रा. पिंप्राळा, जळगाव) हा तरुण सिनेमा पाहून दुचाकीने आकाशवाणी चौकातून जात असताना संशयित आरोपी उमाकांत वाघ आणि आकाश पाटील या दोघांनी त्याचा रस्ता आडवून त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून डोक्यात दगड टाकला. दरम्यान या घटनेत विनोद पाटील हा गंभीर जखमी झाला,
त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर बुधवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अजून त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी उमाकांत वाघ आणि आकाश पाटील या दोघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सलीम तडवी करीत आहे.















Discussion about this post