जळगाव । जळगाव शहर महापालिकेसाठी गुरूवारी (दि. १५) मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली असून शहरात एकूण ५३.५९ टक्के मतदान झाले. महापालिकेच्या ७५ पैकी १२ जागा आधीच बिनविरोध झाले असून उर्वरित ६३ जागांसाठी शहरातील १९ प्रभागातून ३२१ मतदार रिंगणात होते.
निकालाचा प्राथमिक कल दुपारी २ वाजेपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. मतमोजणी प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहेत. १९ प्रभागांतून रिंगणात असलेल्या ३२१ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला काही तासात होणार आहे. त्यामुळे पोस्टल बॅलेटमध्ये कोण पुढे, तर ईव्हीएम कुणाला तारणार याची उत्सुकता आता मतदारांना लागली आहे.















Discussion about this post