जळगाव : जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जळगाव विमानतळावरून गेल्या दीड ते दोन महिन्यांत गोवा, हैदराबाद त्यानंतर पुणे विमानसेवा सुरू झाली. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आता जळगावकरांसाठी मुंबई विमानसेवादेखील २० जूनपासून ‘अलायन्स एअर’ ही विमान कंपनी सेवा सुरू करीत आहे.
या विमानसेवेचे वेळापत्रक विमान कंपनीकडून जाहीर केले असून सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस ही सेवा राहणार आहे. तर जळगाव ते मुंबईचे तिकिटाचे दर ३ हजार ४४० रुपये राहणार आहेत.
उडान ५.० योजनेअंतर्गत मुंबई जळगाव मुंबई या विमान सेवेला मंजुरी मिळाली असून ‘अलायन्स एअर’ विमान कंपनीकडून मुंबई-जळगाव- मुंबई ही विमानसेवा २० जूनपासून सुरू होणार आहे. विमान कंपनीकडून सुरुवातीला आठवड्यातील गुरुवार आणि शुक्रवारी ही सेवा सुरू होणार आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानंतर जळगाव ते मुंबई सेवा विमान कंपनीकडून नियमित केली जाणार















Discussion about this post