जळगाव । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून दुपारपर्यंतची मतदानाची चिंताजनक टक्केवारी समोर आलीय. दुपारी १:३० वाजेपर्यंत शहरात सरासरी २२.४९ टक्के इतकेच मतदान झाले आहे.
सकाळी ११:३० वाजेपर्यंत शहरात १३.३९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासांत (दुपारी १:३० पर्यंत) मतदानाचा वेग काहीसा वाढला असला तरी मतदानाचा वेग अपेक्षेपेक्षा कमीच असल्याचे दिसून येत आहे.
सकाळचे ११.३० ते दुपारचे १.३० या दोन तासांत ३९,९४३ नवीन मतदारांनी केंद्रावर हजेरी लावली. दुपारी १:३० वाजेपर्यंतची एकूण स्थिती : एकूण मतदान: ९८,६४१ (२२.४९%), पुरुष मतदार: ५४,१३२, महिला मतदार: ४४,५०९ असे आहे.
आता शेवटच्या टप्प्यात म्हणजेच दुपारी ३:३० ते ५:३० या वेळेत मतदानाचा टक्का किती वाढतो, यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल. प्रशासनाकडून मतदारांना घराबाहेर पडण्याचे आवाहन वारंवार केले जात असून, सायंकाळच्या सत्रात नोकरदार वर्ग आणि तरुणांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.















Discussion about this post