जळगाव । जळगाव येथील महापालिकेमध्ये प्रसाधन तसेच शौचालयातील बेसिंगमध्ये चक्क चहाचे कप धुतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणत सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकाराबद्दल तसेच कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जळगावातील महापालिकेत आयुक्त यांच्याकडे तसेच दालनात येणाऱ्या मान्यवरांसाठी ज्या कपात चहा दिला जातो, ते सर्व चहाचे कप चक्क आयुक्तांच्या कार्यालयाजवळ असलेल्या प्रसाधन गृहामध्ये तसेच शौचालय गृहात धुतले जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याच प्रसाधनगृहामध्ये शौचालय सुद्धा असून या ठिकाणी असलेल्या बेसिंगमध्ये शिपायाकडून देण्यात येणाऱ्या चहाचे कप धुतले जात आहे.
हा प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. हा व्हिडिओ एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद करुन सोशल मीडियावरव्हायरल केलेला आहे. दरम्यान महापालिकेतील या प्रकाराबद्दल तसेच कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Discussion about this post