जळगाव: जळगाव महापालिकेचे नवीन आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून, यामध्ये एकूण 1452.10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे अंदाजपत्रक सुमारे आडेआठ कोटी रुपयांच्या शिलकीसह मांडण्यात आले आहे.
दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभेत मांडण्यात आला आहे. महापालिकेच्या या अंदाजपत्रकात शहराच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देण्यात आले असून, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी सुविधांच्या उन्नतीसाठी विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.नवीन आर्थिक वर्षात या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून जळगाव शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post