उत्तर भागातून येणाऱ्या थंडी वाऱ्यामुळे महाराष्ट्रात गारठला आहे. राज्यभरामध्ये सगळीकडे शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जळगावकर देखील गुलाबी थंडीची मजा घेत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा १० च्या जवळपास पोहचला आहे.
राज्यातील पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडार या जिल्ह्यातील तापमानाचा पारा १० अंशाजवळ आला आहे. पुण्यातील तापमान ९ अंश सेल्सिअसवर आले आहे. पुणेकर सध्या पुणे, महाबळेश्वर आणि लोणावळ्यातील थंडीप्रमाणे थंडीचा अनुभव घेत आहेत. तर अहमदनगर, नाशिकमधील निफाड आणि जळगाव या जिल्ह्यात खूपच कमी तापमानाची नोंद झाली आहे. थंडी वाढल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी धुक्यांची चादर पसरली आहे.
नाशिक, लातूर आणि वाशिम जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत चालला आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागात थंडी वाढल्याने, नागरिक उबदार कपड्यांना पसंती देताना पाहायला मिळत आहेत. तर अनेक ठिकाणी शेकोट्या देखील पेटल्या आहेत. तर पुढच्या आणखीन काही दिवसांमध्ये गारठा वाढणार असल्याची माहिती देखील हवामान विभागकडून देण्यात आली आहे.
Discussion about this post