मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुढील २४ तास आणखी आव्हानात्मक ठरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आज पुणे, नाशिक, नगर, जळगाव, सातारा, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची किंवा काही ठिकाणी गारपीटची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. बुधवार आणि गुरूवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. नंतर तो ‘येलो अलर्ट’ असेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 4 आणि 5 तारखेला पूर्वेकडे स्थलांतरीत होऊन विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या स्थितीचा आरोग्यावरही परिणाम होताना दिसतो आहे. अचानक तापमान बदल, उष्माघात, डोकेदुखी, थकवा यासारख्या तक्रारी वाढत आहेत. खास करून वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक बनलं आहे.
Discussion about this post