पुणे । मागील काही दिवसापासून राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. राज्यातील बहुतांश धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. तर काही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या भागात जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात पावसाने पून्हा एकदा उसंती घेतली आहे. शनिवार आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर जिल्ह्यात सोमवारी पावसाने विश्रांती घेतली. आज मंगळवारी जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
Discussion about this post