जळगाव : जळगाव महापालिकेच्या निवडणुसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मतदानास अवघे चार दिवस शिल्लक असताना जळगावात महापौर पदाचे आरक्षण अद्याप गुलदस्त्यात आहे. यामुळे इच्छुकांचे आता नगरविकास खात्याच्या सोडतीकडे लागले असून महापौर होण्याचा मान कोणाला मिळणार? याकडे संपूर्ण शहरवासियांचं लक्ष लागले आहे.
नियमानुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर केले जाते. मात्र, यंदा आरक्षणाची अधिसूचना उशिरा निघत असल्याने इच्छुक उमेदवारांसह पक्ष नेतृत्वाचीही धावपळ सुरू आहे.
महापौर पदाचे आरक्षण जाहीर होण्यास होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. जळगावचे महापौर पद महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय की सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
महापौर पदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने इच्छुक उमेदवारांची संपूर्ण रणनीती सध्या अडचणीत आली आहे. अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असला, तरी अंतिम सत्ता-समीकरण महापौर पदाच्या आरक्षणावरच अवलंबून राहणार आहे. त्यामुळे अनेक दिग्गज नगरसेवक आणि संभाव्य उमेदवारांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका स्वीकारली असून, पडद्यामागील हालचालींना मात्र जोर आला आहे.















Discussion about this post