जळगाव । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेला गोंधळ अगदी शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहिला आहे. मात्र आत महायुतीमध्ये अंतिम आकडेवारी जुळली असल्याचं समोर आले आहे. जळगाव महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली आहे. तसेच या निवडणुकीत राष्ट्रवादीला ६ जागा सोडण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
हॉटेल रॉयल पॅलेस येथे भारतीय जनता पक्षातर्फे आ. मंगेश चव्हाण, आ. राजूमामा भोळे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली. यात भारतीय जनता पक्षाला ५० शिवसेनेला १९, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ६ जागा सोडण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
त्यानुसार एबी फॉर्म देखील तयार झालेले असून शिवसेनेतर्फे एबी फॉर्म जमा करण्यात आलेले आहेत. महायुतीच्या फॉर्मुल्याबाबत लवकरच तासाभराने घोषणा केली जाणार असल्याची माहिती महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता कोणत्या उमेदवारांना तिकीट मिळाले ते देखील थोड्याच वेळात कळणार आहे. तसेच तासाभराने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी हे ३ वाजेला एबी फॉर्म महापालिकेत जमा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.















Discussion about this post