जळगाव : भाजपने जळगाव लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. मात्र जळगावची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आला असून अद्याप उमेदवार जाहीर झाला नाहीय. मात्र अशातच उद्धव ठाकरे गटाकडून डॉ. हर्षल माने यांचं नाव चर्चेत आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसला तरी जळगावची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला सुटली आहे. मात्र अद्याप ठाकरे गटाकडून उमेदवाराची घोषणा झालेली नाहीय. परंतु ठाकरे गटाकडून डॉ. हर्षल माने यांचं नाव चर्चेत आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालकिल्ला आहे. अनेक वर्षापासून भाजपचे खासदार या ठिकाणी निवडून येत आहेत. यंदा भाजपने जळगाव मधून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.
महायुतीमध्ये भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित दादा गट एकत्र असले आणि महायुती भक्कम असल्याचे सांगत असले तरी शिंदे गत आणि भाजपामध्ये मोठी धुसपुस असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या वेळेस भाजपा आमचा वापर करून घेते आणि विधानसभेच्या वेळेस आमच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोर उभे केले जातात यावर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता यावर काय तोडगा काढला जातो, हे लवकरच पाहायला मिळणार आहे.















Discussion about this post