जळगाव : महायुतीच्या जळगाव व रावेर मतदारसंघाच्या उमेदवार आज २५ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अर्ज दाखल करणार होते. परंतु, त्यांना उशीर होत असल्याने गैरसोय होऊ नये, म्हणून दोघा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आणि जळगाव लोकसभा मतदार संघातील स्मिता वाघ यांनी आज दुपारी आपला पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अर्थात दुपारी ३ वाजेच्यापर्यंत अर्ज भरण्याची वेळ देण्यात आली आहे. त्यापूर्वी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरला आहे. भाजपाने महा विजय रथ तयार केला असून यामधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत गेस फाउंडेशन पासून रथ निघणार आहे . त्यानंतर पुन्हा भाजपचे उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र भरणार आहे.
शेवटच्या दिवशी प्रवेशाचे नियम बदलले
जिल्हाधिकारी कार्यालया मध्ये नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देखील हजेरी लावणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात बंदोबस्त होता. असे असतानाही पत्रकारांना आत सोडण्यात येत होते.















Discussion about this post