Sunday, February 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीच्या दुचाकीसह मोबाईल हस्तगत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 13, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीच्या दुचाकीसह मोबाईल हस्तगत
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी व मोबाईल चोरी करणाऱ्या तीन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. दोन आरोपीना तालुका पोलिस स्टेशन तर एका आरोपीला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुका पोलीस स्टेशन, धरणगाव पोलीस स्टेशन आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी आणि दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे धरणगाव शहरातील आणि जळगावातील असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने शनिवारी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून १५ मिनीटांनी धरणगाव शहरातून संशयित आरोपी राजू भिमसिंग बारेला (वय-२३) आणि दिपक सुमऱ्या बारेला (वय-२९) दोन्ही रा. मधुकर नगर, धरणगाव यांना अटक केली. दोघांकडून चोरीच्या दोन दुचाकी आणि एक मोबाईल हस्तगत केला. तर दुसऱ्या पथकाने संशयित आरोपी रमेश फुलसिंग देवरे (वय-२३) रा. श्रीकृष्ण लॉनी, जळगाव याला जळगावातून अटक केले. त्याच्याकडून १ चोरीचा मोबाइल हस्तगत केला आहे. पुढील कारवाईसाठी धरणगावातील दोघांना जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले तर जळगावातील चोरट्यांला एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधिन केले आहे.

यांनी केली कारवाई
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपूत, पोउनि गणेश वाघमारे, पोहेकॉ जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, संदीप साळवे, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, भारत पाटील आणि अशोक पाटील यांनी ही कारवाई केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठमध्ये ९२ जागांवर भरती

Next Post

रानभाज्यांमध्ये मानवी आरोग्याला आवश्यक औषधी गुणधर्म – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रानभाज्यांमध्ये मानवी आरोग्याला आवश्यक औषधी गुणधर्म – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

रानभाज्यांमध्ये मानवी आरोग्याला आवश्यक औषधी गुणधर्म - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026
रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 21, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page