जळगाव । असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स (AHAR) ने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदचा भाग म्हणून, महाराष्ट्रातील २०,००० हून अधिक बार आणि परमिट रूम उद्या १४ जुलै रोजी बंद राहणार आहे. विशेष जळगाव जिल्ह्यातील देखील सर्व दारूचे दुकान बंद राहणार आहे.
जळगाव जिल्हा रिटेल वाइन असोसिएशनच्या वतीने दि.१४ रोजी राज्य शासनाच्या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. अवाजवी करवाढ, फीवाढ झाली असताना व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यातच अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने व्यवसायाची कोंडी होत आहे. त्यामुळे करवाढीला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी कोर्ट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढण्यात येणार आहे.
तसेच या दिवशी व्यवसायदेखील बंद ठेवले जाणार आहेत. या मूकमोर्चात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परमीट रूम वाइन असोसिएशनचे अध्यक्ष ललित पाटील यांनी केले आहे.
Discussion about this post