जळगाव । लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून अशातच जळगावमधून लाचखोरीची एक मोठी बातमी समोर आली आहे. शासकीय कंत्राटदाराचे लायसन्स नूतनीकरणासाठी 15 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव उद्योग, उर्जा व कामगार विभाग गणेश नागो सुरळकर (52, पार्वती नगर, जळगाव) यांना जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी कार्यालयातच उशिरा अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जळगावातील 32 वर्षीय तक्रारदार हे कंत्राटदार असून ते शासनाची इलेक्ट्रिकल कामे करतात व त्यांच्याकडे त्यासाठी लायसन्स आहे. या लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांनी आरोपी सुरळकर यांच्याकडे अर्ज केला होता. लायसन्स नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे मंगळवारी 15 हजारांची लाच मागणी करण्यात आल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व पडताळणीनंतर पंचांसमक्ष लाच स्वीकारताच सुरळकर यांना मंगळवारी सात वाजेच्या सुमारास कार्यालयात अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Discussion about this post