जळगाव । जळगाव शहरात हिट अॅण्ड रनची घटना समोर आलीय. ज्यात मद्यधुंद चालकाने ओव्हरटेक करीत असताना महिला जोरदार धडक दिली. त्यात वंदना सुनील गुजराथी या महिलेचा मृत्यू झाला. अपघात इतका भयानक होता की वंदना गुजराथी १५ ते २० फूट फेकल्या गेल्या. धडक देऊन भरधाव वेगाने पुढे जात त्या चारचाकीने आणखी दोघांना धडक दिली.हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अखेर एका ठिकाणी चिखलात वाहन फसल्याने तिथून त्याने घर गाठले. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर आणि तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. रामानंद नगर पोलिसांनी मद्यधुंद वाहन चालक मोंटू शिवपाल सैनी हा कार (क्र.एम.एच.19, ई.पी.1694) यास ताब्यात घेतले आहे.
जखमी वंदना गुजराथी यांना काही नागरिकांनी लागलीच खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र गुरुवारी सकाळी त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. रामानंद नगर पोलिसांनी सैनीला ताब्यात घेत त्याचे वाहनदेखील जप्त केले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.















Discussion about this post