जळगाव । नववर्षाच्या मुहुर्तावर 1 जानेवारी 2025 पासून जळगाव शहरासह राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकल धारकला हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण पहाता सन-2024 मध्ये झालेल्या 561 अपघातांमध्ये सुमारे 441 जणांचा मृत्यु झालेल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर मोटार वाहन कायद्यान्वये दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान करणे अनिवार्य केले आहे. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 नुसार तसेच सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी वाहन चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तिने देखील हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले आहे.
Discussion about this post