जळगाव | जळगाव शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली. ज्यात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार करण्यात आली आहे. दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी एका तरुणावर कमरेखाली गोळीबार करून गंभीर जखमी केलं. यात महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे हा तरुण जखमी झाला असून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेनंतर मारेकरी दोन जण फरार झाले आहे.
याबाबत असे की, महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे हा तरुण जळगाव शहरातील मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स येथे बसलेला होता. त्यावेळी दुचाकीवर विशाल कोळी नामक व्यक्ती हा त्याच्या साथीदारासोबत दुचाकीने आला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून विशाल कोळी यांनी दादू उर्फ महेंद्र सपकाळे यांच्यावर गोळी झाडली. यामध्ये त्याच्या कमरेखाली गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना घडल्यानंतर दोन्ही मारेकरी घटनास्थळ येथून पसार झाले.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी घटनांसाठी ताब्यात घेतले. दरम्यान घटनासाठी पंचनामा केला. यावेळी या ठिकाणी दोन फायरिंग केल्याचे बोलले जात आहे. जखमी झालेल्या महेंद्र सपकाळे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान जखमी आणि संशयित आरोपी हे दोघेजण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
Discussion about this post