जळगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून ७० ते ७२ हजार रुपयापर्यंत पोहचलेल्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली. आठवडाभरात चांदी तीन हजार ३०० रुपयांनी वधारली आहे. त्यामुळे चांदीचे भाव ७४ हजार ३०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. तर सोन्याच्या दरात देखील चढउतार पहावयास मिळत आहे.
सोने-चांदीच्या बाजारपेठेत सातत्याने चढउतार पहावयास मिळत आहे. सुवर्ण बाजारात ही सुरु असलेली चढउतार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढउताराने होत आहे. (Gold Price) सोन्याचे दार ६० हजाराच्या वर पोहचले होते. तर चांदी देखील ७० हजाराच्या वर गेली आहे. सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू असून ते पुन्हा ५९ हजार रुपयांच्या पुढे जात ५९ हजार १०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे.
अधिक मास सुरू झाल्यानंतर सोने- चांदीच्या भावात वाढ झाली होती. त्यानंतर मात्र अधिक महिना संपताच त्यांचे भाव कमी झाले. चांदीचे भाव तर ७ ऑगस्टपासूनच कमी होत जाऊन ते ७० हजार २०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी त्यात एक हजार रुपयांची वाढ झाली व चांदी ७१ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.
Discussion about this post