जळगाव । ऐन लग्नसराइच्या काळात सोन्याने मोठी उसळी घेत थेट ६६ हजारांचा टप्पा गाठला आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकाना मोठा झटका बसलाय. दरम्यान, येत्या काळात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारातही सोन्याच्या भावाने उसळी घेतली असून चांदीचे भावात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. आठवडाभरात सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचेही भाव ७४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे ६६००० रुपये प्रतितोळा झाले असून जीएसटीसह सोन्याचा दर ६८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोने ६२ ते ६३ हजारांदरम्यान होते. मात्र अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र अस्थिर झाल्याने मार्चच्या सुरुवातीला सोन्याची भाववाढ सुरू झाली. दरम्यान, येत्या काळात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.















Discussion about this post