जळगाव । सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सुवर्णनगरी जळगावमध्ये गेल्या 48 तासांत सोन्याने 2 हजारांची उडी घेतली. यामुळे सोन्याने सर्व विक्रम मोडीत काढले असून जीएसटीसह 24 कॅरेट सोने प्रतितोळा 66 हजार रुपयांच्या घरात पोहचले आहे. सोन्याच्या या हनुमान उडीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात, मार्चमध्ये सोन्याने धुमाकूळ घातला आहे. लग्नसराई सुरु असतान सोन्याच्या या दमदार खेळीने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. मार्च महिन्यात सोन्याने एकदम उसळी घेतली आहे. सोने अजून 70 हजारांचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
जळगावच्या सराफा बाजारात सोन्याने वर्षभरातील नवीन उच्चांक गाठला. अवघ्या 48 तासांत भाव गगनाला भिडले. दोन हजारांची रेकॉर्डब्रेक चढाई सोन्याने केली आहे. आज, 7 मार्च रोजी सुवर्णनगरीत 64,500 रुपये असा सोन्याचा भाव आहे. जीएसटीसह सोन्याचे दाम 66 हजार रुपयांच्या घरात पोहचतात. त्यामुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशावर ताण आला आहे. त्यांना आज अधिक पैसे मोजावे लागत आहे. जळगावात चांदीच्या भावात 700 रुपयांची घसरन होऊन ती 72 हजार 800 रुपये प्रति किलो वर आली.
Discussion about this post