जळगाव । इराण-इस्त्रायल युद्धामुळे सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झाली होती. मात्र आता या दोन्ही देशातील युद्ध थांबले असून त्यानंतर सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण झाली. जळगावमध्ये सोन्याच्या दरात एकाच दिवसात 1100 ची मोठी घसरण झाली आहे. यामुळे सोने 96,400 प्रति तोळ्यावर आले असून चांदीचा दर 1,07,000 वर स्थिर आहे.
२५ जून रोजी १०० रुपयांची वाढ होऊन सोने ९७ हजार ५०० रुपये झाले. २६ जून रोजीदेखील ते याच भावावर स्थिर होते. मात्र २७ जून रोजी त्यात एक हजार १०० रुपयांची घसरण झाली व सोने ९६ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले. इराण-इस्त्रायल युद्ध थांबल्यापासून सोन्याचे भाव कमी-कमी होत आहे.
चार दिवसात सोन्याचे भाव तीन हजार रुपयांनी कमी झाले आहेत, ११ जून रोजी सोने ९६ हजार ५०० रुपये प्रति तोळा होते. त्यानंतर वाढत जाऊन ते एक लाखापर्यंत गेले होते. आता २७ जून रोजी ते ९६ हजार ४०० रुपयांवर आले आहेत.
Discussion about this post