जळगाव । जळगाव तालुक्यातील भोलाणे, देऊळवाडे येथे गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गूळ, नवसागर मिश्रित असलेले कच्चे रसायन तयार करणे व साठविण्यासाठी जमिनीत सिमेंट कॉन्क्रीटने तयार केलेल्या टाक्या भूमीगत पद्धतीने बांधलेल्या होत्या. त्या टाक्या व परिसरात असलेल्या चुली पथकाने जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केल्या.
तालुक्यातील भोलाणे व देऊळवाडे गावात तापी नदीकाठी मोठया प्रमाणात गावठी हातभट्टी दारुची निर्मीती होत असते. त्या अनुषंगाणे जिल्हाधीकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस विभाग तसेच महसूल विभाग यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली. यात दोन्ही गावांमध्ये गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केले.
या ठिकाणाहून दोन लाख ८० हजार रुपये किमतीचे १४ हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले. या प्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक लीलाधर पाटील, चंद्रकांत पाटील, दुय्यम निरीक्षक सी.आर. शिंदे, एस.बी. भगत, जी.सी. कंखरे, सुरेश मोरे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर, पी.पी. तायडे, गोकुळ अहिरे, व्ही.टी.हटकर, दिनेश पाटील, धनसिंग पावरा, सत्यम माळी, पी.एस. भामरे, मनोज मोहिते, पोहेकॉ. सुधाकर शिंदे, बापू कोळी, गजानन पाटील तसेच भोलाणे तलाठी राहुल अहिरे व पोलिस पाटील रवींद्र सपकाळे, देऊळवाडे तलाठी मनोहर बाविस्कर यांनी ही कारवाई केली.
Discussion about this post