Thursday, February 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि वादळामुळे केळी व मका पिकांचे मोठे नुकसान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 14, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि वादळामुळे केळी व मका पिकांचे मोठे नुकसान
बातमी शेअर करा..!

पालकमंतत्र्यांनी दिले तत्काळ पंचनाम्याचे निर्देश

जळगाव। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. यादरम्यान गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठं नासधूस झालं. १२ एप्रिल रोजी रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात व १३ एप्रिल रोजी जळगाव तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे व गारपिटीनंतर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः रावेर शहरासह भोकर, भादली खुर्द परिसरामध्ये तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही केळी व मका या नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वादळामुळे बऱ्हाणपूर – अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाच्या मदतीने तत्काळ एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून, वीज वाहिन्यांचेही नुकसान झाले आहे. उन्हाच्या तडाख्यानंतर थोडासा गारवा अनुभवास आला असला तरी गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून काही शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनामार्फत बाधित भागात नुकसानीचा प्राथमिक आढावा घेण्याचे कार्य सुरू असून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत की, “शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता तात्काळ मदतीचा प्रस्ताव तयार करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदतीचा दिलासा देता येईल.” तसेच, हवामान खात्याच्या सूचनांचा विचार करून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे व पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! २ लाखापेक्षा जास्त पगार मिळेल, पात्रता जाणून घ्या?

Next Post

शिरपूरमध्ये तब्बल ३३ लाखाचा गांजाचा साठा जप्त ; एकास अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिरपूरमध्ये तब्बल ३३ लाखाचा गांजाचा साठा जप्त ; एकास अटक

शिरपूरमध्ये तब्बल ३३ लाखाचा गांजाचा साठा जप्त ; एकास अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नीट धोतर नेसता येत नाही, अन्.. ; भगतसिंह कोश्यारिंचा एकेरी उल्लेख करत संजय राऊतांच्या हल्लाबोल

नीट धोतर नेसता येत नाही, अन्.. ; भगतसिंह कोश्यारिंचा एकेरी उल्लेख करत संजय राऊतांच्या हल्लाबोल

February 12, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

मध्य रेल्वेचं मोठं गिफ्ट! जळगाव भुसावळमार्गे पुणे-नागपूर विशेष गाडी धावणार, पाहा वेळापत्रक

February 12, 2026
SEBI मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी : दरमहा मिळेल 89000 पेक्षा जास्त पगार

सरकारी कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता जाणून घ्या

February 12, 2026
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

पोलीस अधिकाऱ्यात वाद? एकनाथ खडसेंवर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

February 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page