जळगाव । जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरु झाले असून सुरुवातीच्या चार तासात म्हणजेच सकाळी ११.३० वाजेपर्यंत शहरात सरासरी १३.३९ टक्के मतदान झाले आहे.
मतदानाच्या सुरुवातीच्या दोन तासांत जळगावकरांमध्ये मतदानाचा फारसा उत्साह दिसून आला नव्हता. सकाळच्या सत्रात ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांत केवळ ५.५ टक्के मतदान झाले होते. मात्र १० वाजेनंतर मतदानाचा वेग वाढण्यास सुरुवात झाली आहे.
सकाळी ११.३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान झाले असून यात एकूण ५८,६९८ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. यामध्ये ३३,२५७ पुरुष आणि २५,४४१ महिला मतदारांचा समावेश आहे. कडाक्याची थंडी आणि घरगुती कामांमुळे सुरुवातीला महिलांची संख्या कमी होती, परंतु आता महिला मतदारही मोठ्या संख्येने घराबाहेर पडताना दिसत आहेत.















Discussion about this post