Thursday, April 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 2, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च
बातमी शेअर करा..!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव; 

जळगाव | जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत निधीच्या प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्हा राज्यात सलग चौथ्यांदाअव्वल ठरला असून, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण/ आदिवासी घटक (TSP/OTSP) व अनुसूचित जाती (SCP) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात विविध शासकीय विभागांच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 834 कोटी 61 लाख 89 हजार रुपयांचा संपूर्ण निधी 100 टक्के खर्च करण्यात प्रशासनाला यश आले आहे. विशेष म्हणजे, सलग चौथ्या वर्षी हा विक्रम प्रस्थापित झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे व वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकारे तसेच खासदार व सर्व आमदार यांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने हे यश प्राप्त केले आहे. भविष्यातही विकासकामांना गती देत जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार प्रशासनाने यावेळी व्यक्त केला.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, “100 टक्के निधी खर्च हा जनतेच्या विश्वासाचा सन्मान आहे. प्रशासनाने नियोजनबद्ध काम करत हा विश्वास जपला आहे. , नियोजन आणि टीमवर्कचा हे यश असून प्रत्येक रुपया हा जनतेचा असून तो योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे, ही प्रशासनाची सतत भूमिका राहिली आहे.” “सलग चार वर्ष 100 टक्के निधी खर्च करणे ही प्रशासनाची मोठी कामगिरी आहे. यामागे सर्व विभागांचा समन्वय, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मेहनत मेहनत आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी आहे. आज करण्यात आलेला सत्कार हा केवळ सन्मान नसून, पुढील काळात आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत चालू आर्थिक वर्षात उपलब्ध होणाऱ्या निधीचा नियोजनबद्ध वापर करून विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, सर्व विभागांनी समन्वयाने काम करून जिल्ह्याच्या विकासाला यापुढेही हातभार लावावा, असेही आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

प्रशासनाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, पोलीस अधीक्षकडॉ .महेश्वर रेड्डी , महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे तसेच जिल्हा नियोजन अधिकारी भरत साळुंखे , जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, यावल प्रकल्प संचालक अरुण पवार व विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी संपूर्ण प्रशासनाच्या टीमचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.

जिल्ह्यासाठी मंजूर निधीपैकी सर्वसाधारण घटकासाठी 677 कोटी रुपये, अनुसूचित जाती घटक (SCP) साठी 93 कोटी रुपये आणि आदिवासी घटक (TSP/OTSP) साठी 64 कोटी 61 लाख 89 हजार रुपये असा एकूण 834 कोटी 61 लाख 89 हजार रुपयांचा निधी पूर्णतः खर्च करण्यात आला. या निधीच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती मिळत असून, ग्रामीण तसेच शहरी भागात अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.

सन 2026 – 27 साठी मंजूर नियतव्य 900 कोटी

सन 2026 27 या आर्थिक वर्षात एकूण 900 कोटी 05 लक्ष रुपयांचा निधीच्या आराखड्यास शासनाने मान्यता दिली. मागील वर्षाच्या तुलनेत 65 कोटी 43 लाख 11 हजार इतक्या निधीची वाढ झालेली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढणार? इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची घोषणा

Next Post

भाजपमध्ये ते ५० आमदार जाणार? संजय राऊतांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
.. मग् मोदी-शाह आणि फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील ; संजय राऊत नेमकं काय म्हणाले

भाजपमध्ये ते ५० आमदार जाणार? संजय राऊतांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

April 2, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

तरुणांना करिअर घडविण्याची संधी; जळगावमध्ये विविध कंपन्यांत इंटर्नशिप उपलब्ध

April 2, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

ग्राहकांना दिलासा ! जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, नवीन दर तपासून घ्या

April 2, 2026
परिणिती चोप्राचा नवरा खासदार राघव चड्ढांना मोठा धक्का ; राज्यसभेतील ‘या’ महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी

परिणिती चोप्राचा नवरा खासदार राघव चड्ढांना मोठा धक्का ; राज्यसभेतील ‘या’ महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी

April 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page