जळगाव । जळगाव जिल्ह्यातील १८ नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी दोन टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल आज २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून जाहीर होत आहे. यात भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, पारोळा, एरंडोल, पाचोरा, भडगाव, शेंदुर्णी, यावल, सावदा, फैजपूर, रावेर, धरणगाव व वरणगाव या नगरपालिका तर मुक्ताईनगर आणि नशिराबाद या नगरपंचायतींचा समावेश आहे. तुमच्या शहरात नगराध्यक्ष कोण होणार याबाबतचे अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत..
लाईव्ह निकाल..
- भुसावळ नगरपालिकामध्ये शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे विजयी
- वरणगाव नगरपालिकेत मोठा उलटफेर; नगराध्यक्षपदी बंडखोर उमेदवाराचा विजय
- भडगाव येथे एकुण २४ जागांपैकी शिंदे शिवसेना १९, भाजप ४, अपक्ष १ तसेच नगराध्यक्ष शिंदे शिवसेना 1511 मतांनी विजयी.
- अमळनेर नगरपरिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.परिक्षीत बाविस्कर विजयी
- चोपडा शिवसेनेच्या नम्रता पाटील यांची विजयी आघाडी
- पाचोरा येथे शिवसेना शिंदे गटाच्या सुनीता पाटील यांची विजयी आघाडी तर भडगाव येथेही शिवसेना शिंदे गटाच्या रेखा मालचे यांची निर्णायक आघाडी
- चाळीसगावमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी प्रतिभा चव्हाण दुसऱ्या फेरीत 1400 मतांनी आघाडीवर
मुक्ताईनगर नगरपंचायतवर शिंदे गटाच्या संजना चंद्रकांत पाटील विजयी
प्रभाग क्रमांक 1 गणेश टोंगे शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 2 नईम बागवान बीजेपी विजयी
प्रभाग क्रमांक 3 नुसरत बी खान अपक्ष विजयी
प्रभाग क्रमांक 4 हाशमशः अपक्ष विजयी
प्रभाग क्रमांक 5 नासिमाबी खान शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 6 प्रीती वानखेडे शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 7 सोनवणे अंजनाबाई सुपडू शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 8 साधना हरिश्चंद्र ससाने भाजपा विजयी
प्रभाग क्रमांक 9 सलमाबी मुशीर मणियार अपक्ष विजयी
प्रभाग क्रमांक द10 ताहेराबी लूकमान शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 11 मस्तान कुरेशी शिवसेना विजयी
मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक 12 माधुरी सचिन पाटील भारतीय जनता पार्टी विजयी
प्रभाग क्रमांक 13 बबलू उर्फ संतोष कोळी शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 14 प्रमोद भारंबे शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 15 सविता भलभले शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 16 देवयानी शिरसाठ शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 17 अनुसयाबाई चिंचोले बीजेपी विजयी
- धरणगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत धरणगाव शहर विकास आघाडीच्या लिलाबाई सुरेश चौधरी विजयी झाल्या आहेत. त्या 2447 मतांनी विजयी झाले
- जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायत भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गोविंद शेठ अग्रवाल विजयी
- पारोळा नगराध्यक्ष 1ली फेरी अखेर शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील आघाडीवर
- फैजपूरात राष्ट्रवादी काँग्रेस सुम्मैय्या शेख कुरबान यांना मोठी आघाडी तर सावदा येथून भाजपच्या उमेदवार रेणुका पाटील यांना आघाडी
- चाळीसगाव येथे भाजपच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण यांना भक्कम आघाडी तर अमळनेर शिवसेनेचे डॉ. परिक्षित बाविस्कर हे आघाडीवर
- मुक्ताईनगरात शिवसेना शिंदे गटाच्या संजना चंद्रकांत पाटील यांना भक्कम आघाडी
- सावदा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सुभद्राताई बडगे यांना आघाडी
- धरणगाव नगरपरिषद प्रभाग क्र. ३ ब -कविता मच्छिंद्र पाटील महाराष्ट्र जनविकास आघाडी (शिवसेना भाजपा महायुती)
विजयी - पारोळ्यात शिवसेनेचे चंद्रकांत भिकनराव पाटील आघाडीवर
- धरणगाव नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक १ अ मधून लक्ष्मण विठोबा माळी (शविआ) हे विजयी झाले, प्रभाग क्रमांक १ ब मधून सुरेखा विजय महाजन विजयी झाले आहे. प्रभाग क्रमांक २ अ मधून प्रमिला आत्माराम शिरसाठ विजयी तर प्रभाग २ ब मधून कविता मश्चिंद्र पाटील (महाराष्ट्र जनविकास आघाडी) विजयी.
- पाचोरा शहरात शिवसेना सुसाट, प्रभाग एक आणि दोनमधून नगरसेवकपदाचे दोन्ही उमेदवार विजयी.
- यावलमधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या छायाताई अतुल पाटील यांना आघाडी. रावेर भाजपच्या संगिता महाजन यांना भक्कम आघाडी
- भुसावळमधून भाजपच्या रजनीताई संजय सावकारे यांना चांगली आघाडी.भुसावळच्याच प्रभाग क्रमांक एकमधील भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयी.
- चाळीसगावमधून भाजपच्या प्रतीभा चव्हाण, चोपड्यात भाजपच्या साधना चौधरी, नशिराबादला भाजपचे योगेश पाटील आघाडीवर. निकाल लागण्याच्या अगोदरच चाळीसगावमध्ये भाजपच्या वतीने विजयी बॅनर फडकले.
- मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेच्या संजना पाटील, रावेरमध्ये भाजपच्या संगीता महाजन तर अमळनेरमध्ये शहर विकास आघाडीचे जितू ठाकूर आघाडीवर.















Discussion about this post