जळगाव । जिल्ह्यात जरी पावसाची मोठी तूट असली तरी जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांसह मध्यम प्रकल्पांमधील जलसाठ्यात मात्र वाढ झालेली दिसत आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्प मिळून जिल्ह्यातील एकूण जलसाठा ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात जिल्ह्यातील सिंचनासाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या गिरणा प्रकल्पातील जलसाठा ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, या प्रकल्पात आवक सुरूच आहे. त्यामुळे जरी जिल्ह्यात पाऊस नसला तरी धरणांमधील वाढत जाणारा जलसाठा दिलासादायक आहे. जिल्ह्यात गिरणा, वाघूर व हतनूर हे मोठे प्रकल्प आहेत. त्यात वाघूर धरणावर जळगाव शहरासह जामनेर शहराचा पाणीपुरवठा होत असतो.
वाघूर धरणात गेल्या १५ दिवसांपासून ६५ टक्के एवढा जलसाठा कायम आहे. तर हतनूर धरणात २७ टक्के जलसाठा असून, या धरणातून ६ दरवाजे उघडण्यात आले असून, १० हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग या धरणातून सुरू आहे.
मोठ्या प्रकल्पांची सध्याची स्थिती…
गिरणा धरण – ६५ टक्के
वाघूर धरण – ६५ टक्के
हतनूर धरण – २७ टक्के
मध्यम प्रकल्पांची स्थिती
सुकी – १०० टक्के
अभोरा- ६९ टक्के
मंगरुळ- ४६ टक्के
मोर- ६५ टक्के
शेळगाव- ०९ टक्के
अंजनी- ४६ टक्के
गूळ- ३८ टक्के
मन्याड- १९ टक्के
तोंडापूर- ९ टक्के
अग्नावती- ००
बोरी-००
हिवरा- ०८ टक्के
भोकरबारी- ००
बहुळा- २४ टक्के
Discussion about this post