Tuesday, February 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 17, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन
बातमी शेअर करा..!

18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती सोहळा; पोवाडा, मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

जळगाव | जळगाव जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दि. 18 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती पूर्वतयारी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मनोज चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे समन्वयक शंभू पाटील, विनोद ढगे,विविध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक व देशभक्तिपर कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवचरित्राचे स्मरण आणि नव्या पिढीला प्रेरणा देणे हा या उत्सवाचा उद्देश आहे

यात 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 ते 12.00 या वेळेत छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह शेजारील मैदानावर गडकिल्ले तयार करण्याची स्पर्धा होणार आहे . त्याच दिवशी सकाळी 9.00 ते 12.00 वाजता भाऊचे उद्यान, काव्य रत्नावली चौक येथे चित्रकला व रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निवडलेल्या उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन दि. 19 फेब्रुवारी रोजी भरविण्यात येणार आहे.

दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराजा स्टेडिअम पासून ते शिवाजी पुतळयापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार असून विद्यार्थी , एनसीसी विद्यार्थी, शिवप्रेमी , नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी होणार आहेत. सहभागींसाठी चहा-नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी व मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तर संध्याकाळी 5.00 ते 8.00 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.

दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.00 ते 10.00 या वेळेत शौर्यगाथांवर आधारित पोवाडा कार्यक्रम होणार असून संध्याकाळी 7.00 वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांचा “शाहिरी शिवदर्शन” हा विशेष पोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा, स्वराज्य स्थापनेचा इतिहास आणि प्रेरणादायी प्रसंग शाहिरी शैलीतून सादर करण्यात येणार आहेत.

शिवजयंती उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

प्राध्यापक भरतीसाठी UGC आधारित नवी प्रणाली लागू; अशा प्रद्धतीने होईल निवड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

February 17, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

प्राध्यापक भरतीसाठी UGC आधारित नवी प्रणाली लागू; अशा प्रद्धतीने होईल निवड

February 17, 2026
स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 17, 2026
सैन्य दलात माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

सैन्य दलात माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

February 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page