जळगाव । राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, हवामान विभागाकडून (IMD)ऑगस्ट महिन्यात राज्यात सरसारीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. आज देखील हवामान विभागाकडून अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात आगामी दोन दिवस ३ व ४ ऑगस्टला विजांचा कडकडाटासह धुव्वाधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शुक्रवारी सव्वापाचच्या सुमारास शहरासह जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस झाला. यामुळे गटारी तुबूंन रस्त्यावर पाणी आले. काही वेळेतच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी परिसरात गुडघाभर पाणी साचले. इतर ठिकाणच्या गटारीही भरभरून वाहत होत्या. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दरम्यान, आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर येलो अलर्ट हवामान खात्याकडून जिल्ह्याला देण्यात आला आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
Discussion about this post