जळगाव । जळगावहून धरणगावकडे जाणाऱ्या धावत्या कारचा स्टिअरिंग रॉड अचानक तुटल्याने ती झाडाला धडकली. या अपघातात कार चालक ठार तर एक जखमी झाला आहे. शरद पाटील (वय २५, रा.सारवे) असे मृत झालेल्या चालकाचे तर सुरेश अशोक अहिरे (वय ४०, रा. सारवे) हे जखमी झाले आहे.
ही घटना मुसळी गावाजवळ घडली. ते दोघे गुरुवारी दुपारी जळगावहून धरणगावकडे कार (क्रमांक एमएच- ०९, डीएक्स- ८९९१) ने जात होते. मुसळी गावाजवळ गाडीचा स्टिअरिंग रॉड अचानक तुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार झाडाला धडक देऊन रस्त्याचे बाजूला शेतात घुसली. अपघात झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. तसेच पाळधी पोलिस चौकीचे कर्मचारी हे देखील माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.
Discussion about this post