जळगाव : जळगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी बँकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढणाऱ्या एकाला नागरीकांनी चांगला चोप दिला. त्यांनतर त्याला शहर पोलीसांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली आहे. शौकत अली अब्दुल गफ्फार (वय 42) रा. कासमवाडी असं व्हिडीओ काढणाऱ्या संशयित व्यक्तीचं नाव असून त्याच्याविरोधात पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं घडलं काय?
जळगावातील रहिवासी तरुणी एका खासगी बँकेत नोकरीला आहे. बुधवारी (6 सप्टेंबर) दुपारच्या सुमारास शौकत अली नामक व्यक्ती बँकेत आला, त्याने कर्मचारी तरुणीशी बोलता बोलता तरुणीचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार कर्मचारी तरुणीच्या लक्षात आल्यावर तिने आरडाओरड सुरू केली, घटनेनंतर नागरिकांनी शौकत अली यास पकडून चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं.
घडलेल्या प्रकारानंतर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी कर्मचारी तरुणीच्या तक्रारीवरुन शौकत अली विरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
Discussion about this post