जळगाव । जगभरात दोन वर्ष धुमाकूळ माजवणाऱ्या कोरोनाची लस आल्यानंतर दिलासा मिळाला होता. आता कोरोना हद्दपार होईल, अशी अपेक्षा असताना नवीन व्हेरियंट धोकादायक ठरत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या नव्या सब-व्हेरियंट JN.1 चा भारतात प्रसार सुरु झाला असून यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
भुसावळ तालुक्यातील १ रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 3 दिवसांत एकूण 794 चाचण्यांमधून १ रुग्ण आढळला आहे. 13 डिसेंबर रोजी ताप, खोकला व श्वासाचा त्रास जाणवू लागला, त्यांनी दि 20 रोजी एका खाजगी डॉक्टरकडे उपचार घेत असलेल्या व्यक्तीचा आज कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रुग्ण हा 6 ते 10 डिसेंबर च्या कालावधीत नेपाळ येथे गेल्याचे समजते. त्यांना सध्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र एक महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या संपर्कातील १४ जन हे निगेटिव्ह आले आहे.
रूग्णांची प्रकृती उत्तम आहे. एचआरसीटी रिपोर्ट २४ आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. या सर्व परिस्थितीवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून आहेत.
Discussion about this post