जळगाव । राज्यासह देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र याच दरम्यान, जळगावात काँग्रेसला झटका बसणार आहे. काँग्रेसचेचा माजी खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.
जळगावचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील या भाजपमध्ये बुधवारी प्रवेश करणार आहेत. याबाबत स्वतः माजी खासदार डॉ. पाटील यांनी माहिती दिली आहे. याबद्दलचे वृत्त सरकारनामाने दिले आहे.
भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान यामुळे राज्यात आणि जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकास व प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे. या विकासयुगाच्या वाटचालीत आपणही सहभागी व्हावे म्हणून आपण कन्या डॉ केतकी पाटीलसह भाजपत प्रवेश करीत आहोत असे उल्हास पाटील यांनी सांगितलं आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपकडून रावेर लोकसभा मतदार संघातून केतकी पाटील या निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे त्यांना या मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबई मतदारसंघाच्या जागेवर उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्यानंतर काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून आता त्यांना दक्षिण मुंबईत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.















Discussion about this post