जळगाव | काँग्रेस पक्षाने जळगावमध्ये मोठी कारवाई केली. ती म्हणजे जळगाव काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. सोबतच डॉ. उल्हास पाटील त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील आणि काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर काँग्रेस तर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वतीने उल्हास पाटील यांच्यासह तिघांना निलंबनाचे पत्र देण्यात आले आहे.
डॉ. उल्हास पाटील, पत्नी डॉक्टर वर्षा पाटील यांच्यासह त्यांची कन्या डॉ केतकी पाटील भाजपच्या वाट्यावर असल्याच्या चर्चेला उत आला.
यातच काँग्रेसच्या वतीने डॉ. उल्हास पाटील, पत्नी डॉक्टर वर्षा पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटना प्रशासन उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीचे पत्र तिघांनाही देण्यात आला आहे.
Discussion about this post