जळगाव । जळगावच्या हवामान अचानक बदल झाला आहे. रात्रीचा पारा वाढल्याने जळगावातील थंडीचा जोर ओसरला आहे. थंडीचा जोर ओसरलेला असला तरी येत्या आठवड्याच्या शेवटी थंडीची तीव्रता पुन्हा वाढणार आहे. २३ ते २६ पर्यंत शीतलहरींमुळे तापमान १० अंशांखाली जाण्याची शक्यता आहे.
सध्या उत्तरेकडून येणारे थंड वारे कमकुवत झाल्याने आणि पूर्वेकडून उबदार हवा येत असल्याने थंडी कमी जाणवत आहे. मात्र, २० जानेवारीनंतर पुन्हा एकदा एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स (पश्चिमी विक्षोभ) सक्रिय होत आहे. या हवामान प्रणालीमुळे जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात हवामान पुन्हा अस्थिर होऊन थंडीची तीव्रता वाढणार आहे. २३ ते २६ जानेवारी धुके व थंडीचा गारठा असेल.
हे आहेत थंडी कमी होण्याचे कारण?
सध्या हिमालयात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असली तरी, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा ओघ हरियाणा आणि राजस्थानमार्गे पाकिस्तानकडे वळला आहे. उत्तरेकडील वाऱ्यांचा केवळ थोडासा भाग मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात येत असल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे.
ढगाळ हवामानः राज्यात स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे ‘टेम्परेचर ट्रॅपिंग’ होऊन रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे.















Discussion about this post