जळगाव । वीज वितरण कंपनीतर्फे मनपाच्या ३३ केव्ही फिडरची देखभाल दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे वाघूर पंपिंग व जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. २६) फिल्टर प्लँटचा विज पुरवठा सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत बंद राहणार असल्याने शनिवारचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
पाणीपुरवठ्याचे रोटेशन एक दिवस पुढे ढकलल्याने २६ रोजी पाणीपुरवठा २७ रोजी तर २७ व २८ रोजीचा पुरवठा २८ व २९ रोजी केला जाणार आहे. रविवारी पिंप्राळा गावठाण, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबानगर, अष्टभुजा, निवृत्तीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडीचा भाग, नित्यानंदनगर, समतानगर, तांबापुरा, जिल्हापेठ, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी पाणी येणार असल्याचे उपअभियंता संजय नेमाडे यांनी कळवले आहे.
Discussion about this post