जळगाव । तालुक्यातील निमखेडी येथील तरुणाच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी (१४ डिसेंबर) रोजी घडली. सागर साहेबराव सोनवणे असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून या खूनप्रकरणी तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.
रविवारी रात्री मारेकऱ्यांनी सागर सोनवणे याच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केले आणि त्याला जखमी अवस्थेत निमखेडी गावात फेकून दिले. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांसह ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी सागरला मयत घोषित केले. मयताच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.















Discussion about this post