जळगाव । अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शहरातील गुरुदेवनगरातील मयंक ऑटो गॅरेजजवळील गुदामावर छापा टाकून सुमारे २१ लाख ९ हजार ६५० रुपयांचा पान मसाला, तंबाखूचा प्रतिबंधित माल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुदाममालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, मयंक ऑटो गॅरेजच्या पाठीमागील गुदामात प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला, तंबाखूचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाला मिळाली. त्यावरून अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी पथकासह एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने छापा टाकला.
गुदामात प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूचा २ लाख १९ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुदाममालक अरुण पाटील (रा. गुरुदेवनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक नीलेश गोसावी तपास करीत आहेत.
राज्यभरातील अधिकारी छाप्यात
विशेष भरारी पथकात नागपूर अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त आर. आर. शहा, एल. पी. सोयाम, वर्धा येथील आर. पी. यादव, अमरावती येथील जी. बी. गोरे, अमरावतीचे आर. एस. वाकडे, बुलढाणा येथील आर. डी. सोळुंखे, जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त माहुल इंदूरकर यांचा समावेश होता.















Discussion about this post